The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

डीजेला फाटा; पारंपरिक सनई वाद्याच्या  सुरांत शारदा  देवीला निरोप!

News Image

स्वराज्य नवयुवक शारदा मंडळ, खैरगाव  (चांदसुर्ला) यांचा संस्कृती जपणारा उपक्रम चर्चेत.

खैरगाव (चांदसुर्ला) :

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ✍🏻 श्री. बंडु पांडुरंग पहानपटे

आधुनिक काळात सण-उत्सवांमध्ये डीजेचा वापर वाढत असताना,  पारंपरिक  वाद्यसंस्कृतीचे महत्त्व जपण्याचा संदेश स्वराज्य नवयुवक शारदा मंडळ, खैरगाव (चांदसुर्ला) यांनी दिला आहे.  शारदा देवीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर न  करता पारंपरिक सनई वाद्याला प्राधान्य देण्याचा मंडळाचा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे.

सनईच्या मंगलमय सुरांत आणि पारंपरिक  वाद्यांच्या  वातावरणात निघणारी विसर्जन मिरवणूक ही आपल्या  संस्कृतीची ओळख जपणारी ठरते. सण-उत्सवांमध्ये आधुनिकतेसोबतच पारंपरिक कलांना आणि वाद्यांना स्थान मिळणे आवश्यक आहे. याच विचारातून  पारंपरिक सनई वाद्याचा वापर करण्याचा मंडळाचा निर्णय इतर सार्वजनिक उत्सव मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरू  शकतो.

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या  ध्वनिप्रदूषणा बाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज  असताना, पारंपरिक वाद्यांचा पर्याय निवडणे हा पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश  आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना ध्वनीमर्यादांचे  पालन करणे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.

परंपरेचा सन्मान, संस्कृतीचे जतन आणि  भक्तिमय  वातावरणाची निर्मिती, या विचारांना प्राधान्य देणारा  स्वराज्य नवयुवक शारदा मंडळ, खैरगाव (चांदसुर्ला)  यांचा हा उपक्रम समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवणारा आहे.

✨ परंपरा जपूया, संस्कृती वाढवूया!

🔱श्री शारदा देवीचा जयघोष; पारंपरिक वाद्यांचा  सन्मान! 🔱

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔डीजेला फाटा; पारंपरिक सनई वाद्याच्या  सुरांत शारदा  देवीला निरोप!🔔चंद्रपूर महानगरातील ३९० पैकी  ३९० बूथवर ‘मन की  बात’चे श्रवण.🔔तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे.🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.🔔कर्जमाफीच्या चवथ्या यादीत  जिल्ह्यातील 1115 शेतकऱ्यांचा समावेश.🔔राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जानवी भगतची  सुवर्णभरारी; डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा गौरव!🔔पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान.🔔राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.